मोठी बातमी! अंधेरी पूर्व मतदारसंघात ठाकरे गटाचीच सत्ता; ऋतुजा लटकेंचा दणदणीत विजय

0
298

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन महिन्यांपासून ज्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमुळे वातावरण तापलं होतं, अखेर या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झालाय.

या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला असून, दादर येथील शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे.

शिवसेनेतील झालेल्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे गटासाठी हा विजय महत्त्वाचा मानला जात आहे.

हे ही वाचा : सत्तास्थापनेबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले, उद्धव ठाकरेंचा बदला घेतला, कारण…

दरम्यान, या निवडणुकीदरम्यान भाजपवर उमेदवार मागे घेण्याबाबतचा दबाव वाढल्यानंतर भाजपने आपला उमेदवार मागे घेतला होता. पण या पोटनिवडणुकीच्या रणांगणात भाजप उमेदवार असता तर ही निवडणूक अटीतटीची ठरली असती.

महत्त्वाच्या  घडामोडी –

 सुषमा अंधारे यांना प्रत्येक सभेच्या किती पेट्या मिळतात?; शिंदे गटातील आमदाराचा सवाल

राज्यात आता लवकरच नवी युती होणार?; नाना पटोलेंच्या विधानाने खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 नेते फुटलेत; फक्त पक्षप्रवेशाचा मूहूर्त बाकी; ‘या’ मोठ्या नेत्याचा गाैफ्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here