Home महाराष्ट्र सत्तास्थापनेबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले, उद्धव ठाकरेंचा बदला घेतला, कारण…

सत्तास्थापनेबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले, उद्धव ठाकरेंचा बदला घेतला, कारण…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात बोलताना एक मोठा गाैफ्यस्फोट केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. शिवसेना आणि भाजपने मिळून मला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केलं होतं. मात्र, शिवसेनेला 2.5 वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याबाबत ठरलं नव्हते. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीदाची मागणी ठेवल्यावर आम्ही याला स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर पालघरची जागा आणि जास्तीची मंत्रालयं देण्याचं शिवसेनेला सांगितलं होतं, असं गाैफ्यस्फोट फडणवीसांनी यावेळी केला.

हे ही वाचा : सुषमा अंधारे यांना प्रत्येक सभेच्या किती पेट्या मिळतात?; शिंदे गटातील आमदाराचा सवाल

दरम्यान, शिवसेनेनं आमच्याबरोबर गद्दारी केली. माझ्या, भाजपच्या पाठीत उद्धव ठाकरेंनी खंजीर खुपसला होता. तेंव्हापासून आम्ही वाट पाहत होतो., असं फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या व्यवहारामुळे एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच आम्हाला याची माहिती मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंबरोबर परत जावा, असं थोडीच त्यांना सांगणार. तेंव्हा, एकनाथ शिंदेंना म्हणालो, बरं झालं आपण बाहेर पडला. आम्ही तुमच्याबरोबर असू., असं मी त्यांना सांगितलं. तसेच माझ्याबरोबर जी गद्दारी झाली, त्याचा आम्ही बदला घेतला, असंही फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राज्यात आता लवकरच नवी युती होणार?; नाना पटोलेंच्या विधानाने खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 नेते फुटलेत; फक्त पक्षप्रवेशाचा मूहूर्त बाकी; ‘या’ मोठ्या नेत्याचा गाैफ्यस्फोट

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवारांच्या भेटीला; उद्धव ठाकरेही मातोश्रीवरून रवाना; ठाकरे-शिंदे भेट होणार?”