विजयानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

0
284

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर लटके यांनी अधिकृतपणे पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.

हा विजय माझा नसून माझे पती रमेश लटकेंचा आहे. त्यांनी पूर्ण राजकीय कारकीर्दीत जी जनसेवा केली त्याचीच पोचपावती म्हणजे हा विजय आहे.मतदारांनी त्याचीच परतफेड केली आहे, असं ऋतुजा लटके म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा :मी नाही खाणार आणि तुला पण नाय खाऊ देणार; नोटाला मिळालेल्या मतांवरून मनसे नेत्याचा भाजपवर निशाणा

भाजपने उमेदवार मागे घेतला असला तरी त्यांनी नोटाला पर्याय निवडण्याचे आवाहन केले होते. याबाबतचा प्रश्न तुम्ही मतदारांना विचारला पाहिजे की, त्यांनी नोटाचे बटण का दाबले. माझे पहिले काम हेच आहे की, रमेश लटके यांची जी अर्धवट कामे राहिली आहेत, त्यांनी ज्यांना कामाचे आश्वासन दिले ते मी पूर्ण करणार. माझी पहिली प्राथमिकता तीच असेल, असंही ऋतुजा लटके यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मोठी बातमी! अंधेरी पूर्व मतदारसंघात ठाकरे गटाचीच सत्ता; ऋतुजा लटकेंचा दणदणीत विजय

सत्तास्थापनेबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले, उद्धव ठाकरेंचा बदला घेतला, कारण…

 सुषमा अंधारे यांना प्रत्येक सभेच्या किती पेट्या मिळतात?; शिंदे गटातील आमदाराचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here