Home महाराष्ट्र “शर्जिल व एल्गार परिषदेसाठी ठाकरे सरकारकडून पायघड्या अन् शिवजयंतीवर निर्बंध”

“शर्जिल व एल्गार परिषदेसाठी ठाकरे सरकारकडून पायघड्या अन् शिवजयंतीवर निर्बंध”

मुंबई :  19 फेब्रुवारीला राज्यभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे. याची नियमावली राज्य सरकारने जाहीर केली. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. यावरुन भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

हिंदू समाज सडा हुवा है म्हणणाऱ्या शर्जिल व एल्गार परिषदेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारकडून कार्यक्रमासाठी पायघड्या, मात्र छत्रपती शिवरांयाच्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करायला बंधने राज्य सरकार घालते.” असं केशव उपाध्ये यांनी म्हटलंय.

“सत्तेसाठी शिवसेनेने अनेकदा काँग्रेस – राष्ट्रवादी पुढे लोटांगण घातले आहे. आता शिवजयंती साजरी करण्यावर बंधने घालून शिवसेनेने ‘घालीन लोटांगण, वंदीन चरण’ चा नवा प्रयोग सादर केला आहे.” असंही केशव उपाध्ये म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी 

“ठाकरे सरकार अशा द्वेषपूर्ण उटपटांग निर्णयासाठी कायम लक्षात राहील”

उदयनराजे भोसलेंनी सांगितलं शरद पवारांना भेटण्यामागचं कारण; म्हणाले…

“शिवजयंतीसाठी ठाकरे सरकारकडून नियमावली जाहीर”

आता महाराष्ट्रातील जनता या तिन्ही पक्षांची घमेंड उतरवेल- आशिष शेलार