Home महत्वाच्या बातम्या छगन भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा; शिंदे गटाच्या दोन आमदारांची मागणी

छगन भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा; शिंदे गटाच्या दोन आमदारांची मागणी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची सगेसोयरेबाबतची मागणी मान्य केली आहे. पण या निर्णयावर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला आहे. मात्र यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील दोन आमदारांनी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून थेट हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे.

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळांची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे. या मागणीला पाठिंबा देत संजय शिरसाट यांनीदेखील भुजबळांवर टीका केली आहे.

ही बातमी पण वाचा : “ब्रेकींग न्यूज! कोल्हापूरात शाळकरी बसच्या सहलीवर अज्ञातांकडून दगडफेक, पोलिस घटनास्थळी दाखल”

मंत्री छगन भूजबळ जो तिरस्कार करतात ते योग्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब भूजबळ यांची हकालपट्टी करा. कशाला लाड करता? याला आधी बाहेर काढा. मंत्रीपदाची शपथ घेताना सरकारच्या विरोधात काम करणार नाही याची शपथ भूजबळ यांनी घेतली आहे. भूजबळ यांच्या भूमिकेशी सरकार सहमत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही सहमत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींची शपथ घेतलीय. ज्या मराठ्यांनी हा देश वाचवला त्यांच्या विरोधात भूमिका घेणे योग्य नाही. एका मंत्र्याच्या विरोधाने सरकारला फरक पडत नाही, मी खुलेआम सांगतोय. त्यांच्या राजीनाम्याने ना सरकारला फरक पडणार आणि ना एनसीपीला” असं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संजय गायकवाड यांचं वक्तव्य वैयक्तिक असलं तरी, काही लोकांना राजकारण करायचं असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे. सरकारमधील मंत्र्यांना सरकार चुकलंय हे सांगायचं असेल तर मंत्रिमंडळ बैठकीत बोलले पाहिजे. बाहेर येऊन बोलायचे असेल तर मंत्रिमंडळातून बाहेर पडले पाहिजे. आता काही लोक आमचे सरकार आल्यास आम्ही असं केलं असतं तसं केलं असतं म्हणतात. मग पूर्वी तुमचं सरकार होतं ना तेव्हा का नाही केलं? राजकारण करताना कोणत्याही समाजाला वेठीस धरू नका”,अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

आता, एक ओबीसी, लाख ओबीसी, म्हणाल का?; पंकजा मुंडेंच्या आवाहनाला, मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

‘…त्यामुळे माझ्यावर राजीनामा देण्याची वेळ आली’; नितीश कुमार यांची प्रतिक्रिया

सर्कशीतल्या जोकरप्रमाणे…; मनसेची सदावर्तेंवर सडकून टीका