Home महाराष्ट्र हा लढून मरणारा समाज आहे हे लक्षात ठेवा- छत्रपती संभाजीराजे

हा लढून मरणारा समाज आहे हे लक्षात ठेवा- छत्रपती संभाजीराजे

मुंबई : मराठा आरक्षणासाठी बीडमधील विवेक रहाडे या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या विद्यार्थ्याला खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजली वाहत असताना संभाजीराजे यांनी ट्विट करत मराठा समाजाला कळकळीचं आवाहन केलं आहे.

विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. समाजासाठी बलीदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली, असं म्हणत संभाजीराजेंनी या विद्यार्थ्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील. आणि मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू! हा लढा सुरू असताना, युवकांनी आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही., असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

एक लक्षात ठेवा हा समाज, “लढून मरावं, मरून जगावं” हेच आम्हाला ठावं, असे पोवाडे गाणारा आहे. माझ्या शूर सरदारांनो खचून जाऊ नका. आज परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली, अंधारात जात असलेली वाटत असली तरी, उद्या नक्की पहाट होईल. सर्व काही ठीक होईल. आपण लढाई जिंकूंच!, असं संभाजीराजे यांनी ट्विट केलं आहे.

माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे कोणीही असे पर्याय निवडू नयेत., असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.


महत्वाच्या घडामोडी-

“भाजप नेते नारायण राणे यांना कोरोनाची लागण”

…अशा दुर्दैवी घटनांची साखळी सुरु होण्यापूर्वी मराठा नेत्यांना जागं व्हावं लागेल- पार्थ पवार

हे कधी थांबणार आहे?; हाथरस प्रकरणावरून सुप्रिया सुळेंची योगी आदित्यनाथांवर टीका

हाथरसनंतर आता बलरामपूरमध्येही एका मुलीवर सामूहिक बलात्कार; पीडितेचा मृत्यू

पवारांना हे झेपणारही नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही- अतुल भातखळकर