Home महाराष्ट्र “लक्षात ठेवा संघर्ष आपल्या सर्वांच्या रक्तात आहे”

“लक्षात ठेवा संघर्ष आपल्या सर्वांच्या रक्तात आहे”

मुंबई : महाराष्ट्रात करोनाचा फैलाव वाढत असून मुंबई, पुणेनंतरक आता सातारा, सांगली येथेही करोनाचे रुग्ण आढळले आहेत. यावर भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सातारा, सांगली येथे कोरोना रुग्ण सापडले असले तरी लोकांनी घाबरून, गडबडून जाऊ नये. लक्षात ठेवा संघर्ष आपल्या सर्वांच्या रक्तात आहे. आपले प्रशासन निपटारा करण्यासाठी मोठ्या हिमतीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे त्यांना आपल्या सर्वांच्या सहकार्याची नितांत गरज आहे, असं ट्विट करत उदयनराजे भोसले यांनी जनतेला आवाहन केलं आहे.

आपण सर्वांनी भारत सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर स्वयंशिस्तीत पालन केल्यास या रोगाला मात देऊ शकतो. काहीही झाले तरी आपण आपल्या घराच्या बाहेर पडू नका. घरातील सदस्याला ताप, डोके दुखी, सर्दी, खोकला, घसा दुखणे इत्यादी त्रास होत असेल तर आपल्या नजीकच्या डॉक्टरशी संपर्क साधा, असंही उदयनराजे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका; उपमुख्यमंत्र्यांचा जनतेला इशारा

राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा आता 97 वर ; सांगलीत 4 तर मुंबईत 3 नवीन रुग्ण

“टाळया किंवा थाळया वाजवून हा करोना विषाणू जाणार नाही”

महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा