मुंबई : महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. नुकतंच ही मुलाखत प्रसारित करण्यात आली. या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या छापेमारीवर भाष्य केले. ईडी वगैरेचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा. मुलाबाळांच्या मागे लागून विकृत आनंद मिळवणाऱ्यांनो, तुम्हालाही कुटुंब, मुलंबाळं आहेत हे विसरू नका, पण आमच्यावर संस्कार आहेत म्हणून संयम ठेवला आहे., असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.
मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबियांवर हल्ले सुरू झाले आहेत. ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नक्कीच नाही. एक संस्कृती आहे., असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना धारेवर धरलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
विराट कोहली वनडे क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ठ खेळाडू; ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचकडून काैतुक
शरद पवारांची वृत्ती पाठीत खंजीर खुपसण्याची- अतुल भातखळकर
“ठाकरे सरकार मनसेला घाबरतं, भाजपच्या मोर्चाला परवानगी मग आम्हाला का नाही?”
मुंबईत आज मराठा क्रांती मोर्चाकडून रास्ता रोको आंदोलन; सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी