आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नितीन देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफासते लावून आत्महत्या केली. या निधनाची बातमी समजताच. अनेक राजकीय नेते तसेच कलाकारांनी त्यांना आदरांजली वाहली.
आपल्या कारकिर्दीत अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये कला दिग्दर्शन करणाऱ्या देसाईंनी अचानक आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. अद्याप यामागील नेमकं कारण समोर आलेलं नाही. नितीन देसाई यांच्यावर बरीच कर्ज असल्याने त्यांनी हे पाऊल उचललं अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहे. नुकतंच नितीन यांच्या बॉडीगार्डने पोलिसांना याबद्दल माहिती दिली.
ही बातमी पण वाचा : ‘या’ माजी राज्यमंत्र्याची संभाजी भिडे यांना थेट जीवे मारण्याची धमकी
नितीन देसाई हे रात्री 10 च्या दरम्यान आपल्या खोलीत गेले. सकाळी जेंव्हा ते बराच वेळ आपल्या खोलीच्या बाहेर आले नाहीत तेव्हा मी दरवाजा उघडायचा प्रयत्न केला. खिडकीतून जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांना नितीन देसाई यांनी गळफास घेतल्याचं दिसलं, त्यानंतर मी, तातडीने पोलिसांना माहिती दिली अन् नितीन यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! संभाजी भिडेंचा खून करणार; माजी राज्यमंत्र्यांचा इशारा, फडणवीसांना लिहिलं पत्र”
याचा अर्थ, फडणवीसांनी मान्य केलं की, संभाजी भिडेंना त्यांनीच…; भास्कर जाधवांचं वक्तव्य चर्चेत