Home महाराष्ट्र “महाराष्ट्रात गेल्या 24 तासात विक्रमी डिस्चार्ज, ‘इतके’ कोरोना रुग्ण झाले बरे; आरोग्य...

“महाराष्ट्रात गेल्या 24 तासात विक्रमी डिस्चार्ज, ‘इतके’ कोरोना रुग्ण झाले बरे; आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई : कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला. एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले. 7358 रुग्ण मुंबई मनपा क्षेत्रातील असून एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत 26997 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आजची संख्या मी जाणीवपूर्वक अधोरेखित जोडतो आहे. सध्याचा आपला रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 43 टक्के इतकं आहे. तर मृत्यूदर हा 3.3 टक्के आहे, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की साधारणपणे दीड टक्के लोक जे व्हेंटिलेटरवर जाऊ शकतात याचाच अर्थ 97 टक्के लोक बरे होऊन घरी जात आहेत ही बाब महत्त्वाची आहे. घाबरुन जाऊ नका पण सावध रहा, असंही टोपे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

…तर मी आत्महत्या करेन; रावसाहेब दानवेंना जावायाची धमकी

देवेंद्र फडणवीस यांना मी ‘ही’ तीन पुस्तकं भेट देणार- हसन मुश्रीफ

हे सरकार आपोआप कोसळेल; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ जनतेची माफी मागावी- सचिन सावंत