Home क्रीडा रंगतदार सामन्यात आरसीबीचा दिल्लीवर अवघ्या एका धावेने विजय

रंगतदार सामन्यात आरसीबीचा दिल्लीवर अवघ्या एका धावेने विजय

IPL 2021 हंगामातील 20 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात बेंगलोरने दिल्ली कॅपिटल्सवर एका धावेने विजय मिळवला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात रिषभ पंत आणि शिम्रोन हेटमायर यांनी दिल्लीला विजय मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र त्यांची झुंज अपुरी पडली.

बेंगलोरने   दिल्लीला जिंकण्यासाठी 172 धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या ऋषभ पंत आणि शिमरोन हेटमायरने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण त्यांना अपयश आले. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 14 धावांची गरज असताना मोहम्मद सिराजने शेवटच्या षटकात 12 धावा देत आपल्या संघाचा विजय सुनिश्चित केला.

बेंगलोरने  दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. शिखर धवनला काईल जेमीसनने तिसऱ्या षटकात बाद केले. वैयक्तिक 6धावांवर बाद झाला. यानंतर स्टीव्ह स्मिथही धावा जमवण्यात अपयशी ठरला. मोहम्मद सिराजने स्मिथला बाद केले. वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने पृथ्वी शॉला माघारी धाडत दिल्लीला अजून एक धक्का दिला. शॉने 21 धावा केल्या.

तीन फलंदाज माघारी परतल्यानंतर कर्णधार पंत आणि मार्कस स्टॉइनिस यांनी 45 धावांची भागीदारी रचली. डावाच्या 13व्या षटकात हर्षल पटेलने स्टॉइनिसला बाद करत आपला दुसरा बळी घेतला. स्टॉइनिसने 22 धावा केल्या.यानंतर शिमरोन हेटमायर आणि पंत यांनी आक्रमक फलंदाजी करत करत सामन्याचे चित्र पालटले.  19 व्या षटकात हेटमायरने 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

दरम्यान, दिल्लीकडून ऋषभ पंतने 6 चौकारांसह 58 तर हेटमायरने 25 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 53  धावांची खेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

रेमडिसिवीर फक्त भाजपच्याच नेत्यांना कसे मिळतात; हसन मुश्रीफांचा सवाल

सर्व इंजेक्शन्स आधीच वाटली आहेत, आता रिकामी खोकी घेऊन जाऊ शकता- सुजय विखे

मुंबईत कोरोना रूग्णांचा आकडा लपवला जातोय; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

RCB Vs DC ! दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय