आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे, अशातच आता. या चर्चेला अजित पवार यांनी स्वत: पूर्णविराम दिला आहे. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करेन, असं विधान अजित पवारांनी केलं.
अजित पवार यांच्या या विधानावर कसबा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी मिश्किल विधान केलं आहे.
ही बातमी पण वाचा : अविनाश जाधव यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, मनसे कार्यकर्त्यांचा वसईत राडा
मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतंय, असं वक्तव्य रवींद्र धंगेकर यांनी केलं आहे. सोलापूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
दरम्यान त्यांनी करमाळा येथील काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या गटबाजीवर भाष्य केलं. स्थानिक नेत्यांचा वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“ज्यांनी भगव्याला कलंक लावले, त्यांचे हात…; जळगावातून उद्धव ठाकरेंचा घणाघात
हर्षल पटेलची गेमचेंजींग गोलंदाजी; रोमांचक सामन्यात RCB चा राजस्थानवर 7 धावांनी विजय
अजितदादांच्या भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…