औरंगाबाद : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज जर असते तर युती तुटली नसती, असं मत भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं आहे.
युतीचे जनक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय प्रमोद महाजन हे आहेत. यांनी घालून दिलेलं सुत्राप्रमाणे भाजप आणि शिवसेनेने आताही जावं अणि जनमताचा आदर करावा, असही दानवे म्हणाले आहेत.
1995 ला सुद्धा असं सरकार आमचं आलं होतं. त्यावेळी ज्यांचे ज्यास्त आमदार त्यांचे मुख्यमंत्री असं या युतीचं सुत्र होतं. तेव्हा शिवसेनेचे मनोहर जोशी आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले आणि आमचा उपमुख्यमंत्री झाला होता.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता पण त्यांनी फोन उचलला नाही. आम्हाला मुख्यमंत्री पद देताल तरच बोला असा आग्रह त्यांनी धरला, असंही रावसाहेब दानवे यांनी म्हटंल आहे.