Home पुणे सत्तावाटपाचं काहीच ठरलं नाही- अजित पवार

सत्तावाटपाचं काहीच ठरलं नाही- अजित पवार

बारामती : काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सत्तावाटपाबद्दल अजुन काहीही ठरलेलं नाही. माध्यमांनी उगाच नको त्या चर्चा करून नये , असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे.

सध्या शेतकऱ्यांना दिलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. प्रत्यक्ष नुकसान पाहून मदत दिली पाहिजे. सध्या राष्ट्रपती राजवट आहे. त्यामुळे सगळे निर्णय केंद्रातून होतात. या पार्श्वभूमीवर आमचे सगळे खासदार याबद्दल केंद्रात आवाज उठवून शेतकऱ्यांना दिलासा देतील, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

आमदार फुटण्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. अनेकजण पहिल्यांदाच निवडून आलेले असल्याने फुाटाफूट होणार नाही. काहींनी पक्ष सोडल्यावर काय निकाल लागतो हे साताऱ्यात सगळ्यांना दिसलंय. त्यामुळे आता कुणी असं करणार नाही, असही ते म्हणाले.

दरम्यान, अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या चिंतेत वाढ झाली असल्याचं समजतय.