“रावसाहेब दानवेंची जीभ कापणाऱ्याला 10 लाखांचं रोख बक्षीस”

0
600

मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. यावरुन विरोधकांनी रावसाहेब दानवेंना चांगलंच धारेवर धरलं आहे. यावर शिवसेना नेते व विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रावसाहेब दानवे यांची जीभ कापणाऱ्या व्यक्तीला 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस देऊ, अशी घोषणा संतोष ढवळे यांनी केली आहे. यवतमाळ येथील शिवसेनेच्या आंदोलनात ते बोलत होते.

रावसाहेब दानवे यांची जीभ जो कोणी कापेल, त्याला आपण लगेच हे 12 लाखांचे वाहन भेट देऊ, त्या क्षणापासून आपण पायी फिरू, वाहन वापरणार नाही, एवढेच नव्हे तर त्याला आणखी 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. शिवाय त्याची रक्ततुलाही केली जाईल, असं म्हणत संतोष ढवळे यांनी दानवेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“कुणीही कोणासोबत गेलं तरी मुंबई महापालिका शिवसेनेकडेच राहणार”

पवार कधी शिवसेनेला तंगडं वर करायला सांगतील आणि कधी…; अतुल भातखळकरांचा शिवसेनेला टोला

आप्पा, तुम्ही अजूनही आमच्यात आहात; धनंजय मुंडेंनी जागवल्या आठवणी

महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड; आजोबांसाठी रोहित पवारांच्या शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here