Home नाशिक “कुणीही कोणासोबत गेलं तरी मुंबई महापालिका शिवसेनेकडेच राहणार”

“कुणीही कोणासोबत गेलं तरी मुंबई महापालिका शिवसेनेकडेच राहणार”

नाशिक : विधान परिषदेच्या निवडणूक झाल्यानंतर आता बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीवर आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. यातच भाजप आणि मनसे एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

जाऊद्या ना, कुणीही कुणाबरोबर गेलं, तरीही मुंबई महापालिका ही शिवसेनेकडेच राहिल. सध्याच्या स्थितीत काहीही बदल होणार नसल्याचं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, भाजपनं मनसेसोबत जाण्याची चर्चेबद्दल पत्रकारांनी राऊतांना प्रश्न केला. त्यावर संजय राऊत यांनी, हैदराबादमध्ये त्यांना ओवेसी मिळाले. मुंबईत कुठल्या पक्षातून ते ओवेसी निर्माण करतात हे बघाव लागेल, असं म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी-

पवार कधी शिवसेनेला तंगडं वर करायला सांगतील आणि कधी…; अतुल भातखळकरांचा शिवसेनेला टोला

आप्पा, तुम्ही अजूनही आमच्यात आहात; धनंजय मुंडेंनी जागवल्या आठवणी

महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड; आजोबांसाठी रोहित पवारांच्या शुभेच्छा

“ठाकरे सरकार ही शरद पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज”