सिंधुदुर्ग : विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस, भाजप खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अधक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारने कपात केली आहे. यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
माजी मुख्यमंत्र्यांची तसेच कोकणाचं नेतृत्व करणारे नारायण राणे यांना दिलेली सुरक्षा व्यवस्था काढून घेतली. हे चुकीचं आहे, असं आशिष शेलार यांनी म्हटलंय. ते सिंधुदुर्गमधील सावंतवाडीत बोलत होते.
नारायण राणेंची सुरक्षा काढली, पण असं काय घडलं की शिवसेना आमदार वैभव नाईक यांना सुरक्षा पुरवावी लागली, असा सवालही शेलार यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी-
“मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही”
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना ड्राॅ; रिषभ पंत, चेतेश्वर पुजाराची शानदार खेळी
“राज ठाकरे यांचे चाहते हेच त्यांचं कवच, सरकारने डोकं ठिकाणावर ठेवावं”
नितेश राणेंना फडणवीस तुरूंगात टाकणार होते, पण…; शिवसेनेचा मोठा गाैफ्यस्फोट