आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून बँकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान 18 डिसेंबर रोजी कणकवलीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. हल्ला करणारा मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुते याला पोलिसांनी अटक केली.
सातपुते याला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीमधून बेड्या ठोकल्या. भाजप आमदार नितेश राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून सातपुते यांची ओळख आहे. पुणे महापालिका निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर सातपुते निवडणुकीच्या रिंगणात होता.
हे ही वाचा : “ज्यांच्या पक्षाची अर्थव्यस्था डबघाईला आली, ते देशाची अर्थव्यस्था कशी मजबूत करतील?”
परब यांच्यावर हल्ला केल्यानंतर सचिन सातपुते त्याचा मोबाईल फोन बंद करून फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला. आणी सचिन सातपुते याला अटक केली.
दरम्यान, आतापर्यंत या प्रकरणात एकूण चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्वजण खराडी-चंदननगर परिसरातील असल्याची माहिती आहे.
महत्वाच्या घडामोडी –
कोंबड्यांना मांजर केल्यानं कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का?; अजित पवारांचा नितेश राणेंना टोला
…अन् चक्क भाजप खासदार नवनीत राणा महिलांसोबत धावू लागल्या; पहा व्हिडिओ
“पवार साहेबांचा वारसा यशस्वीपणानं चालत असल्याचं अजित दादांनी आज सिद्ध केलं- रूपाली पाटील”