आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सूरू आहे. अशातच या अधिवेशनादरम्यान एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला.
या व्हिडिओत शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात दाखल होताच भाजप आमदार नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव’चा आवाज काढला. यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा जुंपली. यावरून आता शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांच्या मुलांवर निशाणा साधला.
हे ही वाचा : “सांगलीत बिबट्यानंतर आता गव्हा रेड्याचे दर्शन; पहा व्हिडिओ”
राणे यांच्या दोन्ही मुलांनी वेळेत सुधारावं अन्यथा नारायण राणे यांचा जसा राजकीय अंत झाला तसा त्यांच्या मुलांचा होईल, असा हल्लोबाल केसरकरांनी केला. तसेच नारायण राणे आपण किती शूर आहे, हे दाखवतात. मात्र पोलिसांना ते घाबरतात., असा टोला केसरकरांनी यावेळी लगावला.
दरम्यान, कोण दीपक केसरकर, असं नारायण राणे यांनी म्हटले होते. आपल्या मुलाच्या खासदारकीचा झालेला पराभव आठवावा म्हणजे केसरकर कोण हे त्यांच्या लक्षात येईल. नारायण राणे त्यांच्या मुलांच्या पोरकटपणावर नियंत्रण आणू शकले नाहीत, अशी टीकाही केसरकरांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
“माझ्यानंतर उद्धवला साथ द्या; विधानभवनात शेवटच्या भाषणात रामदास कदमांचा कंठ दाठला”
मनसेचं खळखट्याक; नांदेड महानगरपालिकेवर केलं टाळे ठोको आंदोलन