मुंबई : राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार अनेक उपाययोजना राबवत आहेत. आणि कोरोनाला थोपवण्याच्या प्रयत्नात आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी करोनाच्या संदर्भात लोकांना काळजी घेण्याच्या अनेक आदेश त्यांनी दिले आहेत. करोना राज्यात आणि मुंबईत वाढू नये यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत आहेत. परंतु अशा पद्धतीची नैसर्गिक संकट येतात. महामारीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव राज्यात होतो. त्यावेळेला सर्व लोकांना विश्वासात घेण्याची परंपरा आहे, असं रामदास आठवले म्हणाले.
कोरोनासारख्या महासंकटाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षीय बैठक आयोजित करून सर्वांना विश्वासात घ्यावे. आम्ही राज्यात सत्तेत नसलो विरोधी पक्ष असलो तरी कोरोना विरुद्ध च्या लढाईत आम्ही सर्व एकजुटीने सरकार सोबत आहोत,’ असंही रामदास आठवले यांनी म्हटलं.
सर्व पक्षीय बैठक pic.twitter.com/SqTrHuwGky
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) March 29, 2020
महत्वाच्या घडामोडी-
पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिराकडून 1 कोटींची मदत
या संकटाच्या काळात राज सुद्धा मला सातत्यानं फोन करतोय- उद्धव ठाकरे
कोरोना ग्रस्तांवर मोफत उपचार करण्याचा राज्यसरकारचा निर्णय- अजित पवार
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवसापासून होणार प्रक्षेपण