राजू शेट्टी हे सरकारी आंदोलक, त्यांची लुटूपूटूची लढाई ही सरकार वाचवण्यासाठी- देवेंद्र फडणवीस

0
137

मुंबई : भाजपावर टीका करताना राजू शेट्टी यांनी भाजपाचं आंदोलन म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे अशी टीका केली होती. या टिकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उत्तर दिलं आहे.

राजू शेट्टी हे सरकारी आंदोलक आहेत. त्यांची लुटूपूटूची लढाई ही सरकार वाचवण्यासाठी आहे. राजू शेट्टी यांचं भाजपाचं आंदोलन म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

दरम्यान, सध्याचा काळ हा अडचणीचा काळ आहे. दूध उत्पादक शेतकरी हा दुधाच्या उत्पन्नावर जगतो आहे. ज्यावेळी दुधाचे दर कमी होतात त्यावेळी दर स्थिर करण्यासाठी सरकार अनुदान देतं. सध्या दुधाला मिळणाऱ्या दरात गायीच्या चाऱ्याचा खर्चही निघत नाही. असं असतानाही सरकारकडून कुठलेही अनुदान मिळत नाही हे दुर्दैवी आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

आंदोलनावरून खोत-शेट्टी भिडले, खोत म्हणतात, ‘हे काजू शेट्टी’ तर शेट्टी म्हणाले, ‘खोत भ्रमिष्ट झाले’

हे सरकार आंधळ्याचे, मुक्याचे आणि बहिऱ्यांचे सरकार असून….; सदाभाऊ खोत यांची राज्य सरकारवर टीका

“महाविकासआघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका”

सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here