Home महाराष्ट्र दूध दरावरून राजू शेट्टी – सदाभाऊ खोत आंदोलनाच्या मैदानात आमने सामने

दूध दरावरून राजू शेट्टी – सदाभाऊ खोत आंदोलनाच्या मैदानात आमने सामने

कोल्हापूर : दूध दरात घसरण झाल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक पेचात सापडला आहे. या शेतकऱ्यांचे दुधाला अनुदान देण्याच्या मागणीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत क्रांती संघटना यांनी शुक्रवारी एकाचवेळी आवाज उठवला आहे. या मुद्यावरुन माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार सदाभाऊ खोत आमने सामने आले आहेत.

करोना संसर्ग वाढू लागल्यानंतर दुधाचे दर घसरले. महानगरातील दुधाची विक्री घटली. दुधापासून तयार होणारे मूल्यवर्धित खाद्यपदार्थ, मिठाईची मागणी थांबली. हॉटेल,आईस्क्रिम, विवाह समारंभ यावर परिणाम झाल्याने दुधाच्या खपावर विपरीत परिणाम झाला आहे.

दरम्यान, टाळेबंदीमुळे राज्यात पिशवीबंद दुधात 20 लाख लिटरने घट झालेली आहे. राज्यशासनाने 10 लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेऊनही दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांकडून गाईडलाईन्स जारी”

आपापसात मारामाऱ्या करा, पण…; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला

परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर..; जयंत पाटलांचा सांगलीकरांना इशारा

माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा…; अजित पवारांचं आवाहन