Home महाराष्ट्र राजसाहेब मी महाराष्ट्र सैनिक म्हणूनच काम करेन, पण…; सुहास दाशरथे यांनी बोलून...

राजसाहेब मी महाराष्ट्र सैनिक म्हणूनच काम करेन, पण…; सुहास दाशरथे यांनी बोलून दाखवली अस्वस्थता

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगबाद : दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा होता. या दौऱ्यात राज ठाकरेंनी औरंगाबादमधील कार्यकारिणीत तडकाफडकी बदल केले. 14 डिेसेंबर रोजी झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष पदावरून सुहास दाशरथे यांची उचलबांगडी केली. यामुळे औरंगाबादमध्ये मनसेतील अस्वस्थता उघड झाली आहे.

जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे चांगेलच अस्वस्थ आहेत. सुहास दाशरथे यांनी ही अस्वस्थता बोलून दाखववताना माझं काय चुकलं, असा सवाल त्यांनी राज ठाकरे यांना केलाय. ते टीव्ही 9 च्या प्रतिनिधींसमोर बोलत होते.

हे ही वाचा : राष्ट्रवादीत पक्ष प्रवेशाचं वारं; रूपाली पाटील यांच्यानंतर ‘या’ नेत्यांनीही बांधले हाती घड्याळ

मला पदावरून बाजूला केलं आहे. महाराष्ट्र सैनिक म्हणूनच काम करेन. पण माझा एकच प्रश्न आहे. साहेब माझं काय चुकलं. मी काम करतोय, पक्ष संघटना बांधणीसाठी काम करतोय, कालच्या दौऱ्यातही स्वागतापासून नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी झटलो. पण माझं काय चुकलं हा खूप मोठा प्रश्न मनात आहे, असं सुहास दाशरथे म्हणाले आहेत.

राज ठाकरेंनी जी जबाबदारी आज माझ्यावर सोपवली आहे. ती निष्ठेनं पार पाडायला मी तयार आहे. मी पुन्हा महाराष्ट्रसैनिक म्हणून काम करायला, झेंडे बांधायला, संतरंज्या टाकायला तयार आहे. फक्त हे का घडलं, याचं स्पष्टीकरण मला हवं आहे, असंही सुहास दाशरथे यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! ‘या’ निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र”

धनंजय मुंडेंनी जगमित्र कारखाना लुटला, मृत माणसांच्या नावांवर पैसे लुटले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रात पुन्हा धुरळा उडणार! बैलगाडा शर्यतीला परवानगी; सुप्रीम कोर्टाचा दिलासा