Home महत्वाच्या बातम्या महाराष्ट्रात पुन्हा धुरळा उडणार! बैलगाडा शर्यतीला परवानगी; सुप्रीम कोर्टाचा दिलासा

महाराष्ट्रात पुन्हा धुरळा उडणार! बैलगाडा शर्यतीला परवानगी; सुप्रीम कोर्टाचा दिलासा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई: गेल्या सहा-सात वर्षांपासून महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले होतं. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे आता बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा : जयंत पाटलांवर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले…

“सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानतो. बैलगाडा प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. महाविकास आघाडीने जोर लावण्याने हा निर्णय आला आहे. दिलीप वळसे पाटील, सुनील केदार, बंटी पाटील या सर्वांना मी धन्यवाद देतो. सर्व बैलगाडा मालकांचे अभिनंदन करतो. हा ग्रामीण भागातील लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता. तसेच महाराष्ट सरकारने जी नियमावली तयार केली आहे त्यानुसार यापुढे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येणार आहे,” अशी प्रतिक्रिया खासदार अमोले कोल्हे यांनी दिली आहे.

दरम्यान, 2017 साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आता या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सात वर्षांनंतर या निर्णयामुळं बैलगाडा शर्यत पुन्हा राज्यात सुरु होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीत प्रवेश करताना रूपाली पाटील झाल्या भावूक, म्हणाल्या…

माझं वय 25 होईपर्यंत त्यांचं काहीच ठेवत नाही; रोहित आर. आर. पाटलांचा थेट विरोधकांना इशारा

कसला शेंबडा आमदार निवडून देता रे; नारायण राणेंचा शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर टीका