मुंबई : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करोना विषाणूचा प्रसार झपाट्यानं होत असल्यानं राज्य सरकारकडून पुन्हा लॉकडाउन करण्याच्या विचारात आहे. मात्र, पुन्हा लॉकडाउनचं संकट ओढवून नये, यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातून महाराष्ट्राला कळकळीचं आवाहन केलं आहे.
समजदार, संवेदनशील व सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे. म्हणूनच लॉकडाउन काळात सर्व जनतेने करोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला. मात्र आता पुन्हा लॉकडाउन परवडणार नाही. लॉकडाउन टाळणं केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे. तेव्हा आपणास माझे कळकळीचे आवाहन राहिल की, मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाउन टाळा, असं आवाहन टोपे यांनी महाराष्ट्राला केलं आहे.
शेवटी स्वतःची काळजी म्हणजेच कुटुंबातील प्रिय व्यक्तींची काळजी, प्रिय व्यक्तींची काळजी म्हणजेच समाजाची काळजी. तेव्हा चला तर हरवूया करोनाला. एकजुटीने, एकमताने, एकनिर्धाराने,” असंही राजेश टोपे यांनी म्हटलंय.
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 22, 2021
महत्वाच्या घडामोडी –
गैरजबाबदार असा पुरस्कार शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना दिला पाहिजे- किरीट सोमय्या
…म्हणून महाराष्ट्रात परत लॉकडाऊन; निलेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका
“देऊळ बंद! वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेगावचे गजानन महाराज मंदीर पुन्हा बंद”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर शरद पवारांचा मोठा निर्णय; म्हणाले