जयपूर : राजस्थानमधील जयपूर येथे एक संतापजनक घटना घडली आहे. वॉर्ड बॉयने रूग्णालयातील ICU मध्ये असेलेल्या महिलेवर रात्रभर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
आरोपीने बेशुद्धावस्थेत असणाऱ्या या महिलेवर रात्रभर हा घृणास्पद प्रकार केला आहे. यावेळी पीडित महिला व्हेंटिलेटरवर होती, तसेच तिच्या तोंडाला मास्क लावण्यात आला होता. त्यामुळे ती ओरडूही शकली नाही.
सकाळ झाल्यानंतर महिलेनं तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगण्याचा प्रयत्न केला. पण तिला व्यवस्थित सांगता येतं नव्हतं. त्यामुळे पीडितेच्या पतीनं पेन आणि कागद दिला, तेव्हा पीडित महिलेनं तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार लिहून सांगितला.
दरम्यान, संबंधित घटना सोमवारी रात्री घडली असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपी खुशीराम गुर्जर याला अटक केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”
पंतप्रधान मोदींचा हाफ चड्डीतील फोटो शेअर करत प्रियंका गांधींचा भाजपला टोला; म्हणाल्या…
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार; सूर्यकुमारचं धमाकेदार आगमन, पहा व्हिडिओ
शरजील प्रकरणात शिवसेनेचंही बेगडी हिंदुत्व आणि सत्तेची लाचारी पुन्हा एकदा जनतेसमोर- चंद्रकांत पाटील