आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच राज ठाकरेंना त्रास सुरू झाला; शिवसेनेचा हल्लाबोल

0
354

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. 1 मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा पार पडली. या सभेत राज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हे ही वाचा : “हैदराबाद हादरलं! मुस्लीम तरूणीशी लग्न केलं म्हणून हिंदू तरूणाची हत्या; तरूणी म्हणाली, माझ्या डोळ्यासमोर…”

गेली 15 वर्षे ज्यांना भोंग्याचा त्रास झाला नाही त्यांना आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच त्रास सुरू झाला, हा पोटदुखीतून सुरू झालेला त्रास आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.  ते पुण्यातील हडपसर येथे बोलत होते.

दरम्यान, तुम्ही भोंग्यांचं राजकारण सुरु केले, जिवंतपणी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, बाळासाहेबांना ज्यांनी जिवंतपणे त्रास दिला, तेच त्यांच्या आता क्लिप फिरवत आहेत, असा घणाघात संजय राऊतांनी राज ठाकरेंवर केला.

महत्वाच्या घडामोडी –

बाळासाहेबांना ज्यांनी जिवंतपणे त्रास दिला, तेच आज…; संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

राम मंदिर आंदोलनापासून मंदिर उभारणीपर्यंत ठाकरे कुटुंबीयांचा यात काहीही संबंध नाही; भाजप नेत्याचं वक्तव्य

…तर राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही; भाजपच्या ‘या’ खासदाराचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here