आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे राज्यात पुन्हा मनसे-भाजप युती होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. यावरून आता राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : “हवाई वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक महिला पायलट भारतीय”
राज ठाकरे आज नाशिक दाैऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजप-मनसे युतीबद्दल भाष्य केलं. मनसे आणि भाजपची युती होणार का? असा प्रश्न राज यांना केला असता, त्यावर राज यांनी सूचक विधान केलं.
युतीच्या चर्चा तुम्हीच घडवून आणता. तुमचा सोर्स काय हे समजत नाही. युतीच्या चर्चा सुरू असतील. पण त्याबाबत मला काहीच माहीत नाही. मनसेने नाशिकमध्ये काम केलं होतं. ते नाशिककरांनी लक्षात ठेवावं, असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
मुंबई महापालिकेत वंचित आघाडीची शिवसेना, काँग्रस सोबत होऊ शकते युती- प्रकाश आंबेडकर
रोहित पवारांच्या खेळीचा भाजपाला झटका! कर्जतमध्ये राष्ट्रवादी बिनविरोध