आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : बुलढाण्यात मध्यरात्री खासगी बसचा अपघात झाला. या अपघातानंतर लागलेल्या आगीत 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा येथे हा अपघात झाला. यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : मी बीआरएसची ऑफर माध्यमातून पाहिली, पण…; बीआरएसच्या ऑफरवर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया
राज ठाकरे यांनी ट्विट करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल बसला झालेल्या अपघाताची दुर्घटना अतिशय भीषण आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे., असं राज ठाकरे म्हणाले.
बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल बसला झालेल्या अपघाताची दुर्घटना अतिशय भीषण आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.
महामार्गांवर अपघातांचं प्रमाण…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 1, 2023
महामार्गांवर अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खाजगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचे ड्रायव्हर्स आणि ट्र्क ड्रायव्हर तर कमालीच्या बेदरकारीने गाड्या चालवतात. ह्यांच्यावर चाप बसवायलाच हवा. अशा अपघातांच्या घटना परत कधीच होणार नाहीत ह्यासाठी आता प्रयत्न व्हायलाच हवेत., असंही राज ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
खोटं बोला पण रेटून बोला हे फडणवीसांचं धोरण; राष्ट्रवादीची टीका
“मोठी बातमी! शिंदे गटाच्या ‘या’ मंत्र्यांवर संकट?; थेट मंत्रीमंडळातून मिळणार डच्चू”