मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. तसंच राज ठाकरे यांनी या पत्रातून खासगी डॉक्टरांच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत.
खासगी डॉक्टरांचं शिष्टमंडळ मला भेटलं. त्यांचं कार्य प्रशंसनीय आहे. पण त्यांनी सरकारी अनास्था सांगितली, त्याने माझं मन विष्णण्ण झालं. कोरोना संसर्गाच्या काळात सरकारने खासगी डॉक्टरांना दवाखाने बंद न करण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉक्टरांनी व्यवसायाशी बांधिलकी लक्षात घेऊन रुग्णसेवा सुरुच ठेवली.
सरकार जर डॉक्टरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देणार असेल, मात्र त्याचवेळी स्वत:ची जबाबदारी विसरणार असेल तर हे चुकीचं आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी तात्काळ याप्रकरणी लक्ष घालून खासगी सेवेतील डॉक्टरांनाही योग्य न्याय द्यावा, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
https://www.facebook.com/RajThackeray/posts/895524820978668
महत्वाच्या घडामोडी-
शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला कोरोनाची लागण; स्वत: फेसबुक पोस्ट करत दिली माहिती
शिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्राची आहे- संजय राऊत
“फार मोठी चूक करताय; सुचक वक्तव्यासह कंगना रणाैतने मुंबई सोडली”