आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच आता राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना पत्राद्वारे नवा आदेश दिला आहे.
हे ही वाचा : राज्यात जर कडक निर्बंध नको असतील, तर…; टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘हा’ इशारा
भोंग्याचा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यामुळे पत्राद्वारे घराघरात पोहचा, असं पत्र राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना लिहिलं आहे.
राज ठाकरेंचं पत्र जसंच्या तसं –
मशिंदींवरील भोंग्याच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा.
तुम्ही एकच करायचं आहे – माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वत: नेऊन द्यायचं आहे कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही.
मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही., अशा आशयाचं पत्र राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना लिहिलं आहे.
महाराष्ट्र सैनिकांसाठी… pic.twitter.com/vCoubS5Aix
— Raj Thackeray (@RajThackeray) June 2, 2022
महत्वाच्या घडामोडी –
“पुण्यात वसंत मोरे फॅक्टर चालणार, 5 नगरसेवक निवडूण आणणार”
“भाजपची मोठी खेळी; जळगावातील शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश”
पुण्यात मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे-संजय राऊत यांची गळाभेट; राजकीय चर्चांना उधाण