मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे राज्य चालवण्यासाठी महसुलाचा ओघ सुरु करण्याच्या दृष्टीने राज्यातील ‘वाईन शॉप्स’ सुरु करा, अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. त्यावरुन आता शिवसेनेनं सामना अग्रलेखातून प्रश्न उपस्थित केला आहे.
राज ठाकरे यांनी ही जी रंगीत-संगीत मागणी केली त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना? की ‘तळीरामां’च्या कोरडय़ा घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली? असं म्हणत शिवसेनेनं सामना अग्रलेखातून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांनी दीनदुबळ्यांचे, शोषितांचे, कोरडवाहूंचे दु:ख सरकारसमोर मांडले. त्यांना याकामी दुवा देणारा एक वर्ग नक्कीच असेल. बाकी सर्व भार सरकारवर, असं म्हणत शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर मी नागपुरात बसल्या बसल्या, लाख-दीड लाख पीपीई किट पाठवतो
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पुन्हा एकदा पत्र, म्हणाले…
महसुलासाठी वाईन शाॅपचा विचार करा; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद आमदारकीचा प्रस्ताव बेकायदेशीर- चंद्रकांत पाटील