आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज ठाकरे यांची काल ठाण्यात जाहीर सभा घेतली. या सभेच्या माध्यमातून त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. यात राज ठाकरेंनी पवार कुटुंबावर आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगान भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
हे ही वाचा : पवारांच्या घरावरील हल्ल्याची निष्पक्षपणे चाैकशी व्हावी- रामदास आठवले
पंकज भुजबळ सकाळी राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थवर पोहोचले होते. या भेटीचं नेमकं कारण समजू शकलं नव्हतं. मात्र राज ठाकरेंच्या सभेतील भाषणामुळे आधीच राजकीय वातावरण तापलं असताना त्यातच ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात मात्र चर्चा रंगली आहे.
दरम्यान, ‘पंतप्रधान मोदींविरोधात बोलल्यानं मला तरुंगात टाकण्यात आलं. पण तरीही मी माझा ट्रॅक बदलला नाही, असं छगन भुजबळ म्हणाले होते. या टीकेवर तुम्हाला तुरुंगवास मोदींवर टीका केल्याने नाही तर तुमच्या संस्थेत झालेल्या गैरकारभारांमुळे घडला, अशी टीका राज ठाकरे यांनी भुजबळ यांच्यावर केली.
महत्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली, अतिदक्षता विभागात उपचार सूरू”
कमळाचा चिखल गेला कोठे?; किशोरी पेडणेकरांचा किरीट सोमय्यांवर निशाणा