आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : आगामी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कालपासून पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेही जोरदार तयारी केली आहे. याच उद्देशाने राज ठाकरे पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी पदाधिकऱ्यांचा नियुक्त्या करताना राज ठाकरे यांनी महिलांना पुढे करण्याच्या निर्णय घेतला आहे. मनसेची रणरागिणी म्हणून ओळख असलेल्या रुपाली पाटील यांच्यावर राज ठाकरेंनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. राज ठाकरे यांनी रुपाली पाटील यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
दरम्यान, राज ठाकरे शनिवारी 9 सप्टेंबर रोजी पीवायसी जिमखाना भांडारकर रोड बाल शिक्षण मंदिर समोर 10 उपशहर अध्यक्ष, 8 विभाग अध्यक्ष यांच्यासोबत बैठक घेतली. सध्या ते आजी माजी नगरसेवकांसोबत बैठक घेत आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“मी जर रखेल किंवा बाजारू बाई असते तर मी ही लढाई लढले नसते”
“…हा बाळासाहेबांचा आम्हाला आशीर्वाद असल्यासारखा आहे”
शिवसेनेचा काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता शिवबंधनात अडकला
ड्रग्सप्रकरणी नवाब मलिकांचा भाजपावर आरोप; आता मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…