“मास्क घालणार नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीत चक्क मास्क लावला”

0
430

पुणे : पुणे दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. मात्र या भेटीवेळी राज ठाकरेंनी चक्क मास्क परिधान केलेला होता. त्यामुळे राज ठाकरेंनी घातलेल्या मास्कची सर्वत्र चर्चा रंगली होती.

संपूर्ण दौऱ्यात विनामास्क दिसलेले राज ठाकरे बाबासाहेबांच्या भेटीवेळी मात्र मास्क घालून होते. राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे पदाधिकारी आणि इतर कार्यकर्तेही उपस्थित होते. राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पुण्यातील बाबासाहेब पुरंदरेंच्या निवासस्थानी राज ठाकरेंनी ही भेट घेतली.

दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे पुढच्या आठवड्यात वयाची 99 वर्ष पूर्ण करणार आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचं वयोमान आणि कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेत राज ठाकरेंनी मास्क लावत काळजी घेतल्याचं दिसतंय.

महत्वाच्या घडामोडी –

दीपक चाहरचा कहर! भारताचा श्रीलंकेवर 3 विकेट्सने विजय; मालिकाही घातली खिशात

मुंबई आणि मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचे पूर्ण सामर्थ्य शिवसेनेत- अतुल भातखळकर

“महाराष्ट्रात मंदीरे बंद, डान्स बार सुरू, यातून राज्य सरकारचा ढोंगीपणा जनतेसमोर उघड”

“नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्याला राहुल गांधींचा हिरवा कंदिल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here