आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर कसली असून त्यासाठी येत्या 2 फेब्रुवारी रोजी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे बैठक घेणार आहेत, या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीची चर्चा राज्यात जोरदार सुरू आहे.
सध्या आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची जोरदार चर्चा आहे. तसेच या बैठकीत मनसे भाजप सोबत युती करणार का?,यावरूनही राज्यात चर्चा आहे. यावरून आता मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : भाजपमधील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार आहेत; नवाब मलिकांचा मोठा गाैफ्यस्फोट
आगामी महानगरपालिका निवडणूकीचा निर्णय राज ठाकरे घेतील, असं संदीप देशपांडे म्हणाले. तसेच आगामी निवडणूकीत मनसे भाजपसोबत युती करणार का?, याचा निर्णय ही केवळ राज ठाकरेच घेतील, असंही संदीप देशपांडे यांनी यावेळी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
‘वाईन आणि दारूमध्ये जमीन-आस्मानाचा फरक, मात्र काहींनी…’, अजित पवारांचा भाजपाला टोला
ठाकरे सरकार मद्यविक्रीचा व्यवसाय कसा वाढेल, यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र…; चंद्रकांत पाटलांची टीका
महापालिका निवडणुकीसाठी ‘मनसे’ मैदानात; ‘या’ दिवशी होणार मनसेची बैठक