आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. 1 मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा पार पडली. या सभेत राज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. यावरुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आहे. त्यांनी बाळासाहेबांना धोका दिला आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.
हे ही वाचा : “धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार, त्यांनी गोपीनाथ मुंडेंप्रमाणे महाराष्ट्राचं नेतृत्व करावं”
राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन करताना सर्व रंगाचे झेंडे आणले होते. पण आता एकच भगवा रंग परिधान केला आहे. मात्र आता भगव्या रंगाच्या विरोधात त्यांचं काम सुरु असल्याचं रामदास आठवले यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी अंगावर भगवे वस्त्र धारण केले ते चांगले आहे. पण राज ठाकरे यांनी शांततेची भूमिका मांडावी, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं, ते आज सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
“भाजपची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”
“राज्यात भोंग्याचं नाही तर भोंगळं राजकारण सुरू आहे”