मुंबई : महाराष्ट्रात परिस्थिती बिकट असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.
राज्यातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी मोदींसमोर राज्यासाठी पाच प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.
राज ठाकरेंच्या पाच प्रमुख मागण्या –
१) महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्या.
२) राज्यातील खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात.
३) सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी.
४) लसीचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी.
५) करोनावरील उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधं उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पावलं उचलण्यासाठी मोकळीक द्यावी.
Posted by MNS Adhikrut on Tuesday, 13 April 2021
कोविडची साथ सुरू झाल्यापासून महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. देशातल्या पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले. तेव्हापासून निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्देवाने सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात देखील झाले आहेत. आज संपूर्ण देश कोविडच्या साथीला तोंड देत असातना महाराष्ट्रातली स्थिती सर्वात बिकट झाली आहे,” असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.
“कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर 100 टक्के लसीकरण करण्याची रणनीती महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे व कळीची आहे. म्हणूनच महाराष्ट्रात 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्टं ठेवून, राज्यातील सर्व वयोगटातील 100 टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवं. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेषत: कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी, महाराष्ट्राला केंद्राची साथ हवीच, असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण”
ब्रेक द चेन नव्हे तर चेक द ब्रेन; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेच्या तोंडाला पानं पुसली; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा?, मुख्यमंत्र्यांंनी जरा विचार करून बोलावं- अतुल भातखळकर