आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं असून याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून शेतकऱ्यांना भरघोस भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. आशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जर 50 हजार रुपये केंद्रानं राज्य आपत्ती निधीतून द्यायला सांगितले असेल तर ते देता येईल, कारण केंद्राकडूनच हा निधी दिला जातो, असं अजित पवार म्हणाले आहेत. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान, केंद्र सरकारनं दुजाभाव करु नये. कारण आम्ही पैसे मागितले तर पैसे मिळत नाही. पण काही राज्यांना पैसे न मागता दिले जातात हे अयोग्य आहे. असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, प्रत्येक शेतकऱ्याला 50 हजाराची मदत द्या; राज ठाकरेंची मागणी
भर कार्यक्रमात भाजपचा नेता स्टेजवरून कोसळला; पहा व्हिडिओ
“केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल”
जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले; पंकजा मुंडेंचा घणाघात