Home महाराष्ट्र शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानं राज ठाकरे दु:खी, पण…; मनसेची प्रतिक्रिया

शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानं राज ठाकरे दु:खी, पण…; मनसेची प्रतिक्रिया

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं. यावर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी आपले मत व्यक्त केले .

निवडणूक आयोगाचा निर्णय तांत्रिकदृष्ट्या योग्य असला तरी एखाद्या पक्षावर ही वेळ यावी ही दु:खद घटना आहे. याचं कुठेही राजकीय भांडवल करावं हा माझ्या नेत्याचा स्वभाव नाही. नामुष्कीची वेळ आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जबाबदार आहेत, असा आरोप प्रकाश महाजन यांनी यावेळी केला.

हे ही वाचा : येणाऱ्या काळात महाराष्ट्रातून भाजप संपून जाईल; शिवसेनेच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

उद्धव ठाकरे निष्पाप असल्याचा बुरखा पांघरतात. राजकारणात शपथा घेऊन चालत नसतं. त्यांना मृत माता-पित्याचा आधार घ्यावा लागला. सल्लागार चुकीचा असल्यावर काय होऊ शकतं हे उद्धव ठाकरे उदाहरण आहेत, असं प्रकाश महाजन म्हणाले आहेत.

दरम्यान, बाळासाहेबांनी कष्टाने शिवसेना पक्ष उभा केला. मात्र आयोगाच्या निर्णयानंतर राज ठाकरेही आनंदित झाले नसतील. पण उद्धव ठाकरे मात्र अहंकारात बुडाले होते. मात्र राजकारणात डावपेच सुरू असतात. आता त्यांना आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे, असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मनसेत पक्ष प्रवेशाचं वादळ; लातूरमध्ये विवध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मला मारण्याची सूपारी दिली होती, आता शिवसेनेचं प्रत्युत्तर, म्हणाले…

“ठाकरे-शिंदेंना धक्का; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, धनुष्यबाण चिन्ह गोठवलं”