आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : छत्रपती शिवाजी महारांचा इतिहास घराघरांत पोहचवणारे शिवशाहीर बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचं काल निधन झालं. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेबांच्या निधनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे शिवाज्ञा’ शीर्षकाचे व्यंग्यचित्र काढून बाबासाहेबाना आदरांजली अर्पण केली. राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हे व्यंगचित्र पोस्ट केले आहे.
हे ही वाचा : विक्रम गोखलेंच्या ‘त्या’ वक्त्यावर अभिनेत्री स्वरा भास्करची प्रतिक्रिया, म्हणाली…
व्यंग्यचित्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्यातील संवाद आहे. उजवीकडे सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत आणि डावीकडे बाबासाहेब पुरंदरे हात जोडून उभे आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब पुरंदरेंना उद्देशून म्हणतात, “ये रे माझ्या गड्या, मला शोधण्यासाठी जगभर खूप पायपीट केलीस. अविश्रांत मेहनत घेतलीस, माझ्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलंस! ये, आता जरा आराम कर”, असं या व्यंगचित्रात म्हटलं आहे.
#शिवशाहीर #बाबासाहेब_पुरंदरे #छत्रपतीशिवाजीमहाराज pic.twitter.com/RbyhyNcvu0
— Raj Thackeray (@RajThackeray) November 16, 2021
महत्वाच्या घडामोडी –
रुग्णालयात पेशंटला भगव्याचं रक्त असेल तरच देणार का?; अमोल कोल्हेंचा विक्रम गोखलेंना सवाल
रोहित शर्मा कर्णधार असताना विराट कोहलीला संघात काय स्थान असेल; स्वत: रोहितनं दिलं उत्तर, म्हणाला…
“उद्धव ठाकरे पार्टटाईम मुख्यमंत्री, राज्यात फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा”