आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
गोंदिया : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे यांनी अनेक भाजपच्या दिग्ग्ज नेत्यांची भेट घेतली. यावरुन शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
हे ही वाचा : “शिवसेनेचं बळ आणखी वाढणार; ‘हा’ मोठा नेता उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर?”
राज ठाकरे हे मागच्या लोकसभेत भाजपला लाव रे तो व्हिडीओ म्हणत होते. तीन चार महीन्यापूर्वी हेच राज ठाकरे मस्जिदीवरून भोंगे काढा असं म्हणत होते. मात्र, ते भोंगेही सुरू आहेत आणि एकाही भोंग्यावरून हनुमानचालीसाही म्हटली गेली नाही, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत. ते आज गोंदियात असताना माध्यमांशी बोलत होते.
राज ठाकरे त्यावेळेसच्या महाविकास आघाडी सरकार,शिवसेनेला विरोध करीत होते. आता भाजपा त्याच राज ठाकरेंना मित्र बनवू पाहत आहे. कारण राज ठाकरेंची भाषा आणि वर्तन आहे ते भाजपाशी मिळते- जुळते असून राज ठाकरे म्हणजे भारतीय जनता पक्षाची शाखा आहे. असं अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“शिवसैनिकच आगामी निवडणुकीत शिंदेला गटाला जागा दाखवतील”
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नंबर वन; तब्बल 22 ग्रामपंचायती घेतल्या ताब्यात
ग्रामपंचायत निकाल 2022! अकोल्यात शिवसेनेचा भगवा फडकला, 6 पैकी 2 जागांवर मारली बाजी