“राज ठाकरेंनी मास्क नाही घातला आणि कोरोना झाला तर त्याला सरकार जबाबदार नाही”

0
165

नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी तोंडाला मास्क लावले नव्हते. यावेळी ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं. यावर काँग्रेस नेते व मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरे हे राज्यातील मोठे नेते आहेत. त्यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी तोंडाला मास्क लावावा ही आमची विनंती आहे. पण त्यांनी मास्क घातला नाही आणि त्यांना कोरोना झाला तर त्याला सरकार जबाबदार राहणार नाही, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं.

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी टी.व्ही.9 मराठीशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आवाज उठवल्यामुळे माझ्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला”

“बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही “

मोठी बातमी! भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

…तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर बसू शकला असता का?; मुख्यमंत्र्यांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here