Home जळगाव राज ठाकरेंनी नेहमी आपल्या भूमिका बदलल्या, त्यांच्या भोंग्याचा आता ठेंगा झाला- गुलाबराव...

राज ठाकरेंनी नेहमी आपल्या भूमिका बदलल्या, त्यांच्या भोंग्याचा आता ठेंगा झाला- गुलाबराव पाटील

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. 1 मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा पार पडली. या सभेत राज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. यावरून आता शिवसेना नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांनी वेळोवेळी आपल्या भूमिका बदलल्या आहेत, आता त्यांनी भोंगा आणला, मात्र त्याचा ठेंगा झाला आहे, असा टोला गुलाबराव पाटलांनी राज ठाकरेंना यावेळी लगावला. ते जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

हे ही वाचा : “शिवसेनेची मोठी खेळी; मनसेच्या ‘या’ मोठ्या नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

या माणसाने आतापर्यंत तीन वेळा आपली भूमिका बदलली आहे. आता त्यांना चौथी भूमिकाही बदलणे त्यांना अवघड नाही. त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सर्व समाजाला सोबत घेण्याची भूमिका घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी झेंडाही चार रंगाचा ठेवला होता. तर पक्ष स्थापन करण्याअगोदर मराठीची भूमिका घेत उत्तर प्रदेशच्या लोकांच्या कानफटात मारली. त्यानंतर पुन्हा आपली भूमिका बदलली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. त्यानंतर मोंदीच्या विरोधी भूमिका घेत ‘लाव रे तो व्हीडीओ’ म्हणत त्यांच्यावर टिकाही केली. त्यानंतर पुन्हा आपली भूमिका बदलत झेंड्याचा रंग बदलला आणि आता पुन्हा मोदींची प्रशंसा करत आहेत. आता त्यांनी ‘भोंगा’ काढला. मात्र आता त्याचा ‘ठेंगा’ झाला आहे, असा हल्लाबोल गुलाबराव पाटलांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या भाजप खासदाराला मनसेचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

डोंबिवली ग्रामीणमध्ये शिवसेनेचा मनसेला खिंडार; मनसेचे दोन नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार?

शरद पवारांनी फडणवीसांवर केलेल्या ‘या’ आरोपावर रामदास आठवलेंंची प्रतिक्रिया, म्हणाले…