Home नाशिक बाळासाहेबांच्या विचारांवर पुढे जाण्याचा राज ठाकरेंचा मनसैनिकांना सल्ला

बाळासाहेबांच्या विचारांवर पुढे जाण्याचा राज ठाकरेंचा मनसैनिकांना सल्ला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय्यत तयारी केली आहे मनसेप्रमुख राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. कालपासून नाशिकमध्ये असलेल्या राज ठाकरे यांनी शहरात आणि जिल्ह्यात मनसेचे वर्चस्व पुन्हा स्थापन करण्यासाठी पक्षसंघटनेत मोठे फेरबदल केले.

नाशिकमध्ये शहरातील शाखाध्यक्षपदाच्या नेमणुका पार पडल्यानंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शाखा अध्यक्ष म्हणून नेमणूक मान्य आहे का? परत कुठे आलो असे म्हणू नका. तुमच्यावर कुठली जबाबदारी सोपवली जाणार आहे याची कल्पना तुम्हाला नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. पक्षाची शिस्त पाळावी लागणार.  ज्यांना बोलवलं त्यांनीच यायचं, अशा सूचना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

पक्षात जुने-नवे असे काहीच नसते. माणसं येतात आणि जातात. सर्वांत  महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त लोकांना सोबत घेणं  आहे. बाळासाहेबांनी मला घराबाहेरचे जोडे दाखवले. त्यांनी विचारलं हे काय आहे, मी म्हणालो, हे जोडे आहेत. मात्र तेव्हा बाळासाहेब म्हणाले, हे जोडे नाही तर ही आपली संपत्ती आहे. लोकांना नावाने ओळखता यायला हवं तरच लोक तुम्हाला ओळखतील. शाखा अध्यक्षानंतर गटाध्यक्ष नेमले जाणार आहेत. तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या सांगितल्या जातील, असं राज ठाकरेंनी  सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

“काँग्रसेच ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांचं निधन, वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”

भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा दावा

‘संजय राऊतांनी आता राजकारण सोडावं’; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

पालकमंत्री उदय सामंत हे कोकणातील शक्ती कपूर; नितेश राणेंची टीका