2020 मधल्या पहिल्याच टी-20 सामन्यावर पावसाचं पाणी; भारत-श्रीलंका सामना रद्द

0
289

गुवाहटी : भारत विरूद्ध श्रीलंका यांच्या पहिल्याच टी-20 सामन्यावर पावसाचं पाणी फिरलं. पिच ओलं असल्यामुळं सामना रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला. आता दुसरा सामना 7 जानेवारी रोजी इंदूरला होणार आहे.

या सामन्यात भारतानं टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सामना सुरू होण्याआधीच मुसळधार पावसामुळं सामन्याला विलंब झाला. अखेर पंचांनी हा सामना रद्द झाल्याचं जाहीर केलं.

दरम्यान, 2020 मधल्या पहिल्याच सामन्याची उत्सुकता सार्वांना लागली होती. या वर्षातला पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाला.

महत्वाच्या घडामोडी-

-“हिंमत असेल तर या तिन्ही पक्षांनी स्वतंत्र लढवून दाखवावं”

-“राज्यातील कोणत्याही आमदाराला पगार न देता शेतकऱ्यांना मदत करा”

-महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारणं म्हणजे द्वेषाचं राजकारण- अमोल कोल्हे

-शिवसेनेने अपयशी लोकांना सोबत घेऊन जनादेशाचा अनादर केला- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here