राहुल द्रविडच्या मुलाने ठोकले द्विशतक

0
247

बंगळुरू : कर्नाटकच्या राज्यस्तरीय अंडर-14 मॅचमध्ये राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडने द्विशतक केलं आहे. 14 वर्षांच्या समित द्रविडने उपाध्यक्ष-11 या टीमकडून खेळताना धारवाड झोनविरुद्ध 201 रनची खेळी केली.

समित द्रविडने 256 चेंडूमध्ये 210 धावांच्या केलेल्या या खेळीमध्ये 22 फोरचा समावेश होता. द्विशतक केल्यानंतर समितने दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 94 धावा केल्या. बॉलिंग करताना समितने 26 रन देऊन 3 विकेटही घेतल्या.

अंडर-14 क्रिकेटमध्ये समितने याआधीही चांगली कामगिरी केली होती. 2018 साली समितने माली आदिती आंतरराष्ट्रीय शाळेकडून खेळताना 150 रन केले. अंडर-14 राज्यस्तरीय बीटीआर कपमध्ये समितने ही कामगिरी केली होती.

दरम्यान, स्कोअरबोर्डवर पाहिलं तर समित हा खेळ त्याचे वडील राहुल द्रविड यांच्या स्टाइलनेच खेळल्याचं जाणवतं.

महत्वाच्या घडामोडी-

-बाळासाहेब हयात असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते- नारायण राणे

-नागरिकत्व कायद्याला जे लोक विरोध करत आहेत ते देशद्रोही- संभाजी भिडे

-अजित पवार हे आमचे होणारे उपमुख्यमंत्री; संजय राऊत यांचं सुचक वक्तव्य!

-डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर आज पुण्यात अंत्यसंस्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here