मुंबई : सिंचन घोटाळा प्रकरणी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संपूर्ण क्लीन चिट मिळालेल्या अजित पवार यांच्या संदर्भात शिवसेनेचे प्रमुख नेते संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
सिंचन घोटाळ्यातून क्लीन चिट मिळाल्याबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात ‘एसीबी’कडून क्लीन चीट मिळाल्याचा आनंदच आहे, ते आमचे होणारे उपमुख्यमंत्री आहेत, असं सुचक वक्तव्य केलं आहे.
राऊत हे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे नेते आहेत. त्यामुळेच राऊत यांच्या या विधानाला महत्त्व आहे. 24 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यात शिवसेनेचे 10, राष्ट्रवादीचे 11, आणि काँग्रेसचे 8 मंत्री शपत घेणार आहेत.
दरम्यान, पहिल्या मंत्री मंडळाच्या विस्तारात कोणाला मंत्रीपद मिळेल या कडे सगळ्याचं लक्ष आसताना अजित पवार यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडणार, ही शक्यता आता अधिकच बळावली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर आज पुण्यात अंत्यसंस्कार
-आमच्या सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेला वाईट परिस्थितीतून बाहेर काढलं- नरेंद्र मोदी
-“पुढील वर्षभर तरी ‘ठाकरे सरकार’वर अविश्वास दाखवण्याच्या भानगडीत पडू नका”
-भाजपाचे नेते कोणी आपल्याकडे बघत नाही ना, याची खात्री करून माझ्यासोबत हात मिळवणी करतात