क्वारंटाइन लोक बाहेर फिरताना दिसल्यास त्यांनाजेलमध्ये टाका; मनसेची मागणी

0
220

मुंबई : राज्यात करोनाने थैमान घातलं असून त्याचा फैलाव रोखण्याचं मोठं आव्हान राज्य सरकारसमोर आहे. एकीकडे करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी राज्य सरकार पुरेपूर प्रयत्न करत असताना होम क्वारंटाइन करण्यात आलेले काही लोक बाहेर उघडपणे फिरत असल्याचं समोर आलं आहे. यावर क्वारंटाइन करण्यात आलेले लोक बाहेर फिरताना दिसल्यास त्यांना सरळ जेलमध्ये टाका अशी मागणी मनसे आमदारा राजू पाटील यांनी केली आहे.

डोंबिवलीत करोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. हे दोघेही परदेश प्रवास करुन आलेले असतानाही घरात न थांबता बाहेर फिरत होते. यामुळेच राजू पाटील यांनी होम क्वारंटाइन करण्यात आलेले लोक बाहेर फिरताना दिसले तर त्यांना थेट जेलमध्ये टाकण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, डोंबिवलीत करोनाचे दोन रुग्ण आढळल्यानंतर राजू पाटील यांनी ही मागणी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

पोलीसदेखील एक माणूसच आहे, त्यांच्यावर किती ताण द्यायचा- जयंत पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला पुण्यातील हॉस्पिटलमधील नर्सशी मराठीत संवाद

शरद पवार यांनी लिहलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

देवेंद्र फडणवीस यांच राज्य सरकारला समर्थन; म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here