पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेतील एका बड्या महिला नेत्याला गळाला लावले.
पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या माजी गटनेत्या आशाताई बुचके या भाजपमध्ये प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब झाला असून पुढील आठवड्यात बुचके या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी दिली आहे.
आशाताई बुचके या वैष्णवधाम-बुचकेवाडी येथील आहेत. त्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. शिवसेनेचे तत्कालीन आमदार बाळासाहेब दांगट यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यावर आशाताई बुचके यांच्यावर जुन्नर तालुक्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
दरम्यान, बुचके यांचा भाजप प्रवेश पुणे जिल्ह्याच्या राजकारणात मोठा परिणाम करणारा ठरेल, अशी चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या घडामोडी –
सात कशाला, हीच पिढी शिवसेनेला संपवेल; निलेश राणेंचं प्रत्युत्तर
जवळचा मित्र सोबत नसल्याचं दु:ख कायम मनात राहील; आर आर आबांविषयी बोलताना अजित पवार भावूक
पत्र गेलेलं आहे, वाढत्या वयामुळं त्यांच्या लक्षात आलं नसेल; शरद पवारांचा राज्यपालांना टोला
“फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की, स्मृतींना तिलांजली देऊन वेदना देणाऱ्यांवर प्रहार करायचा”